Showing 43–63 of 322 results
Filters-
Ex Rare शिवलिंग चिन्हांकीत दुदांडी शिवराई
अत्यंत दुर्मिळ प्रकार असलेली शिवलिंग चिन्हांकीत दुदांडी शिवराई. शिवराई मध्ये शिवलिंग चिन्ह विविध ठिकाणी आणि विविध प्रकारच्या शिवराई मध्ये आढळून येते. परंतू शिवराई प्रकारात शिवलिंग चिन्हांकीत दुदांडी शिवराई अत्यंत कमी प्रमाणात आढळून येते. छत्र च्या वर शिवलिंग चिन्ह दिसून येत असून चिन्ह व शिवराईच्या दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट दिसत आहेत. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.१७०Weight: 10.170g
-
Rare तीन दांडी शिवराई
Rare तीन दांडी नमुना शिवराई. दुर्मिळ प्रकार. शिवराई मध्ये श्री या अक्षराच्या खाली दोन आडव्या रेषा आढळून येतात, पैकी एक रेषा राजा या शब्दाची शीर्ष रेषा असते. या प्रकारास दुदांडी नमुना शिवराई असे म्हटले जाते. या शिवराई मध्ये श्री अक्षराच्या खाली तीन आडव्या रेषा स्पष्ट दिसत आहेत. दुसरी रेषा ही राजा या शब्दाची शीर्ष रेषा असते, त्यामुळे या रेषेला चिकटून राजा हा शब्द असतो. परंतू या शिवराई मध्ये दुसऱ्या आडव्या रेषेला लागून राजा हा शब्द नसून त्या रेषेच्या खाली आणि एक आडवी रेषा आहे. श्री चे अत्यंत वेगळे लिखाण. श्री आधी पोकळ गोलात डॉट असलेले चिन्ह, श्री नंतर चंद्रकोर, छत्र वर आडवी चंद्रकोर. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.३४०Weight: 10.340g