छ. राजाराम महाराज शिवराई नमुना ८
नमुना ८, शिवराई चा आकार आयताकृती असून त्र चे लिखाण इतर सर्व नमुन्यापेक्षा अत्यंत वेगळे. त्र च्या आडव्या रेषा जाडीला बारीक असून खालील दिशेला झुकलेल्या. ह्या प्रकारची शिवराई अत्यंत कमी आढळून येते.
छ. राजाराम महाराज शिवराई नमुना ७
नमुना ७, ह्या नमून्यातील शिवराई मधील त्र चे लिखाण वेगळे असून आडव्या रेषातील वरील रेषा खालील रेषेपेक्षा लांबीला जास्त आहे. तसेच दोन्ही रेषा दंडारेषेला एका बिंदूत मिळत नाहीत.
छ. राजाराम महाराज शिवराई नमुना ६
नमुना ६, नमुना दोन प्रमाणे नमुना. छ. राजाराम महाराज यांच्या शिवराई मध्ये श्री हे अक्षर नाण्यावर क्वचित दिसून येते. ह्या नमुन्यातील शिवराई मध्ये श्री हे अक्षर नाण्यावर दिसून येत आहे. राम हा शब्द नाण्यावर पूर्ण दिसत नसला तरी छत्र चे लिखाणावरून हि शिवराई छ. राजाराम महाराज यांचीच आहे हे समजून येते. त्र च्या आडव्या रेषा […]
छ. राजाराम महाराज शिवराई नमुना ५
नमुना ५, नमुना दोन प्रमाणे नमुना. जा ह्या अक्षराची दंडरेषा म ह्या अक्षराच्या दंडारेषेवर न येता जरा अलीकडे.
छ. राजाराम महाराज शिवराई नमुना २
नमुना २, ह्या नमुन्यातील शिवराई मधील त्र च्या आडव्या रेषा तलवार पात्याप्रमाणे वक्राकार असून, खालील आडवी रेषा लांबीला थोडी जास्त आहे. त्र साधारण देवनागरी लिपीप्रमाणे.
छ. राजाराम महाराज शिवराई नमुना १
नमुना १, सव्वा अकरा ग्रॅम वजन असलेला नमुना. सामान्यतः छ. राजाराम महाराज यांच्या शिवराई साडेआठ ते साडेनऊ ग्रॅम ह्या वजनातील आढळून येतात. ही शिवराई सव्वा अकरा ग्रॅम वजनाची म्हणजेच जादा वजन असलेली आहे, त्यामुळे वैशिष्ठपूर्णच आहे, तसेच अत्यंत दुर्मिळ देखील आहे. त्र च्या आडव्या रेषा कात्रीच्या पात्यांप्रमाणे असून आखूड आहेत.