Showing 127–147 of 322 results
Filters-
पुष्प चिन्हांकीत शिवराई
पुष्प चिन्हांकीत शिवराई
राजा आणि शिव शब्दांच्या आधी पाच डॉट चे देठ असलेले पुष्प चिन्ह. हा नमुना शिवराई मध्ये अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतो. पाच डॉट च्या फुलाला देठ व शाखा आहेत. अत्यंत वेगळा नमुना. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम 10.110Weight: 10.110g
-
सराफ चिन्हांकीत शिवराई
सराफ चिन्हांकीत शिवराई
शिवराई वर सराफ चिन्ह. सामान्यतः चांदी अथवा सोने या मौल्यवान धातूंच्या नाण्यावर सराफ चिन्ह आढळून येते. तांब्याच्या नाण्यावर सराफ चिन्ह दुर्मिळ. त्र या अक्षरावर फुली हे सराफ चिन्ह. श्री नंतर तीन डॉट्स. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.५५०Weight: 9.550g
-
Sold out!
राजा खाली दुदांडी / चंद्र सूर्य चिन्हांकीत शिवराई
राजा खाली दुदांडी / चंद्र सूर्य चिन्हांकीत शिवराई
दुदांडी शिवराई मध्ये सामान्यतः श्री आणि राजा या अक्षरांच्या मध्ये दोन आडव्या रेषा आढळून येतात. या शिवराई मध्ये राजा या शब्दाच्या खाली दोन आडव्या रेषा असून त्याच्या खाली सीव हा शब्द आहे. सी ची वेलांटी दुदांडी च्या वरील बाजूस आहे. छत्र या शब्दाच्या वर चार डॉट्स व त्याच्या बाजूला चंद्रकोर व पोकळ गोल सूर्य चिन्ह आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.२५०Weight: 10.250g
-
राजा खाली दुदांडी
राजा खाली दुदांडी
दुदांडी शिवराई मध्ये प्रामुख्याने श्री व राजा या शब्दाच्या मध्ये दुदांडी असते. या शिवराई मध्ये राजा व सीव या शब्दांच्या मध्ये दुदांडी आहे. सी ची वेलांटी अत्यंत छोटी आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.६५०Weight: 9.650g
-
चिन्हांकीत शिवराई
चिन्हांकीत शिवराई
श्री आधी अत्यंत वेगळ्या नमुन्याचे चिन्ह. चिन्ह पूर्ण दिसत नसल्याने चिन्हाचे स्वरूप संपूर्ण लक्षात येत नाहीये. परंतु या प्रकारचे चिन्ह शिवराई वर फारच कमी वेळा आढळून येते. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.३५०Weight: 8.350g
-
Sold out!
चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई
चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई
श्री आधी नाजूक चंद्रकोर चिन्ह. दुदांडी शिवराई. श्री चा मोठा आकार, श्री ची शीर्ष रेषा श्री ला छेदून जाणारी. छत्र वर दोन डॉट ची रचना, छत्र ला मात्रा. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.२४०Weight: 9.240g