"Welcome to Shivarai WebApp. ‘Collector First’ is our motto and according to this we have been providing best quality, only genuine coins to collectors at very reasonable prices with best service."
डबल बॉर्डर कमी वजनाची कॅलिग्राफी नमुना शिवराई. श्री चे अत्यंत वेगळे लिखाण. छ ला मात्रा. त्याच्या वर आडवी चंद्रकोर चिन्ह. बारीक अखंड रेषा आणि डॉट्स असलेली डबल बॉर्डर. शिवराईचे वजन फक्त पावणेसात ग्रॅम. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ६.७१०
चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई
श्री अत्यंत लहान लिखाण, श्री नंतर अत्यंत नाजूक चंद्रकोर. छ आधी तीन डॉट्स. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.१५०
मराठा, पुणे मिंट, परशू रुपया
पुणे येथील मिंट मधील शाह अली गौहर याच्या नावे काढण्यात आलेले एक रुपयाचे नाणे. कुऱ्हाड अथवा परशू हे टांकसाळ चिन्ह आहे. नाण्यावरील परशू चिन्हामुळे याला परशू रुपया असे म्हटले जाते. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. AH – 12**, RY – **
M & W – T 5
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ११.१३०
सदोष लिखाण शिवराई ( रेट्रो त्र )
सदोष लिखाण असलेली शिवराई. त्र रेट्रो म्हणजेच उलट आरश्यातील प्रतिमे प्रमाणे. श्री ला शीर्ष रेषा नाही. श्री भोवती अखंड रेषेची बॉर्डर, श्री च्या वेलांटीला चिकटलेली. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.६५०