छ. शाहू महाराज शिवराई नमुना ३
नमुना ३, ह्या शिवराई मध्ये छत्र च्या वर पाI हे अक्षर असून शा दिसत असून उ चे खालील टोक शीर्ष रेषेला चिकटलेले आहे.
छ. शाहू महाराज शिवराई नमुना २
नमुना २, दुदांडी नमुना, उ पहिला असून खालील टोक नमुना १ प्रमाणे शीर्ष रेषेला चिकटलेले नाहीये. श्री नंतर पाI हे अक्षर आहे. छत्र नंतर चे चिन्ह कळून येत नाही. पुढील बाजूस वर्तुळाकार बिंदुमय बॉर्डर दिसत आहे.
छ. शाहू महाराज शिवराई नमुना १
नमुना १, ह्या नमुन्यातील शिवराई दुदांडी ह्या प्रकारातील आहेत. उ पहिला असून, त्याचे खालील टोक फिरून शीर्ष रेषेला चिकटलेले आहे. छत्र नंतर झाड चिन्ह आहे.
छ. राजाराम महाराज शिवराई नमुना ८
नमुना ८, शिवराई चा आकार आयताकृती असून त्र चे लिखाण इतर सर्व नमुन्यापेक्षा अत्यंत वेगळे. त्र च्या आडव्या रेषा जाडीला बारीक असून खालील दिशेला झुकलेल्या. ह्या प्रकारची शिवराई अत्यंत कमी आढळून येते.
छ. राजाराम महाराज शिवराई नमुना ७
नमुना ७, ह्या नमून्यातील शिवराई मधील त्र चे लिखाण वेगळे असून आडव्या रेषातील वरील रेषा खालील रेषेपेक्षा लांबीला जास्त आहे. तसेच दोन्ही रेषा दंडारेषेला एका बिंदूत मिळत नाहीत.
छ. राजाराम महाराज शिवराई नमुना ६
नमुना ६, नमुना दोन प्रमाणे नमुना. छ. राजाराम महाराज यांच्या शिवराई मध्ये श्री हे अक्षर नाण्यावर क्वचित दिसून येते. ह्या नमुन्यातील शिवराई मध्ये श्री हे अक्षर नाण्यावर दिसून येत आहे. राम हा शब्द नाण्यावर पूर्ण दिसत नसला तरी छत्र चे लिखाणावरून हि शिवराई छ. राजाराम महाराज यांचीच आहे हे समजून येते. त्र च्या आडव्या रेषा […]
छ. राजाराम महाराज शिवराई नमुना ५
नमुना ५, नमुना दोन प्रमाणे नमुना. जा ह्या अक्षराची दंडरेषा म ह्या अक्षराच्या दंडारेषेवर न येता जरा अलीकडे.