नमुना १, सव्वा अकरा ग्रॅम वजन असलेला नमुना. सामान्यतः छ. राजाराम महाराज यांच्या शिवराई साडेआठ ते साडेनऊ ग्रॅम ह्या वजनातील आढळून येतात. ही शिवराई सव्वा अकरा ग्रॅम वजनाची म्हणजेच जादा वजन असलेली आहे, त्यामुळे वैशिष्ठपूर्णच आहे, तसेच अत्यंत दुर्मिळ देखील आहे. त्र च्या आडव्या रेषा कात्रीच्या पात्यांप्रमाणे असून आखूड आहेत.